
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील वर्षी हिंदुस्थान दौऱ्यावर येण्याची संकेत दिले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक करत दोन्ही देशात व्यापार कराराबाबत चर्चा पुढे सरकत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले याचा पुनरुच्चारही केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उत्तम चर्चा सुरू असून दोन्ही देशातील व्यापार संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ते पुढील वर्षी हिंदुस्थानचा दौरा करू शकतात, असे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. वजन कमी करण्याच्या औषधांच्या किंमती कमी करण्यासाठी नवीन कराराची घोषणा केल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख महान व्यक्ती व मित्र असा केला.
हिंदुस्थानने रशियाकडून तेल आयात करणे मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. ते (पंतप्रधान मोदी) माझे मित्र असून आमच्यात संवाद सुरू आहे. मी हिंदुस्थानात यावे अशी त्यांची इच्छा आहे, असे ट्रम्प म्हणाले. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी पुढील वर्षी हिंदुस्थान दौऱ्याची योजना आहे का? असे विचारले असता ट्रम्प यांनी होय, असू शकते, असे उत्तर दिले.
#WATCH | Washington DC | On questions of talks over trade deals with PM Narendra Modi, US President Donald Trump says, “They are going good, he stopped buying oil from Russia largely. He is a friend of mine, and we speak and he wants me to go there. We will figure that out, I… pic.twitter.com/jWvcphukfi
— ANI (@ANI) November 6, 2025
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध थांबवले
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्ध मीच थांबवले असा पुनरुच्चारही ट्रम्प यांनी केला. मी थांबवलेल्या आठ युद्धांपैकी पाच ते सहा युद्ध टॅरिफच्या मदतीने थांबवली. हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर होते. दोन्हीही अण्वस्त्रधारी देश असून आठ विमाने पाडण्यात आली होती. त्यामुळे मी त्यांना म्हणालो की, तुम्ही लढाई सुरुच ठेवली तर मी टॅरिफ लादेन. त्यानंतर 24 तासांमध्ये हे प्रकरण मिटले. टॅरिफ नसते तर मी युद्ध मिटवू शकलो नसतो, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेशी व्यापार करार करत चीनची मोठी खेळी; डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव फसला



























































