मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉकचा ताप

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना येत्या रविवारी मेगाब्लॉकचा ताप सहन करावा लागणार आहे. ब्लॉक काळात माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या ट्रकवर चालवण्यात येणार आहे. या दोन स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 वाजल्यापासून ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱया डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱया जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.03 वाजल्यापासून दुपारी 3.38 वाजेपर्यंत सुटणाऱया अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.