
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्याच्या एक निनादाने प्रत्येक जण पेटून उठायचा, ते राष्ट्र गान ‘वंदे मातरम्’ 150 वर्षांचे झाले. या निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी सामूहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले.
देशाची राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विशेष टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले. याकेळी उपस्थित डावीकडून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना. वंदे मातरम् निर्मितीच्या 150 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा येत्या संपूर्ण वर्षभर साजरा करण्यात येणार आहे.



























































