
पायधुनी येथील श्री कालभैरव मठ येथे कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मठाधीश श्री श्री श्री 1008 महंत पीर योगी भाईनाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यानिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 3.30 वाजता पूजा आणि अभिषेक, पहाटे 4 वाजता हवन, सकाळी 6.30 वाजता आरती, दुपारी 12.30 वाजता भंडारा होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


























































