30 वर्षांपासून फरार आरोपीला अटक

गेल्या 30 वर्षांपासून पोलिसांना चकवा देत लपून राहणाऱ्या एका आरोपीला डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी अखेर पकडले. द्विजेंद्र दुबे (65) असे त्या आरोपीचे नाव आहे. फरार झालेल्या आरोपीविरोधात 1996 साली भारतीय दंड विधानाच्या कलम 381 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुह्यात दुबे हा फरार होता. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी सुमारे 30 वर्षांपासून फरार असल्याने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. अखेर डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी लखनऊसह वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा कसून शोध घेत द्विजेंद्र दुबे याला पकडले.