रेफ्रीजरेटरमधून पाणी गळत असेल तर… हे करून पहा

रेफ्रीजरेटर ही एक गरजेची वस्तू बनली आहे. सिंगल किंवा डबल डोअरचे रेफ्रीजरेटर जवळपास प्रत्येक घरी असतातच. या फ्रीजमध्ये काही कालावधीनंतर काही तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर फ्रीज लवकर खराब होऊ शकतो. अशीच एक नेहमी निर्माण होणारी समस्या म्हणजे पाण्याची गळती.

फ्रीजमध्ये जमा झालेले पाणी ड्रेन होलमार्गे मागील बाजूला असलेल्या ट्रेमध्ये जाते. ड्रेन होलमध्ये कचरा अडकल्यास पाणी बाहेर येऊ शकते. त्यामुळे ड्रेन होल बारीक तारेने स्वच्छ करायला हवे. पाण्याचा ट्रे तुटला असेल किंवा पूर्णपणे भरला असल्यास त्यातून पाणी बाहेर पडू शकते. हा ट्रे नेहमी तपासणे आणि स्वच्छ करायला हवा. ट्रे तुटला असेल तर नवीन ट्रे बसवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिंतीपासून फ्रीजच्या मागे आणि बाजूला थोडे अंतर ठेवा.