
एलएलबीच्या पहिल्या सहामाई परीक्षेत मला 500पैकी 499 गुण मिळायला हवे होते. मात्र कमी दिले गेले, असे म्हणत कानपूरमधील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱया विधी शाखेच्या एका विद्यार्थिनीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने 20 हजारांचा दंड ठोठावला. अभ्यासाकडे लक्ष दे असे सुनावत न्यायालयाने तिचा अर्जही फेटाळून लावला.
संतोष पुमारी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शाहूजी महाराज विद्यापीठात पाच वर्षांचा एलएलबी कोर्स करत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिला पहिल्या सहामाई परीक्षेत 181 गुण मिळाले होते. हे गुण चुकीचे आहेत. मला 500पैकी 499 गुण मिळायला हवे होते, असा दावा तिने केला होता.
तिच्या तक्रारीनंतर विधी शाखेतील प्राध्यापकांच्या समितीने पुन्हा एकदा तिच्या उत्तरपत्रिका तपासल्या. या फेरतपासणीतही तिला 181 गुणच मिळाले. न्यायालयाने विद्यापीठाचा हा निकाल ग्राह्य धरत संतोष पुमारीचा अर्ज फेटाळला. ‘‘स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि प्रामाणिक प्रयत्न कर. जेणेकरून पुढच्या वेळी जास्त मार्प मिळवता येतील आणि न्यायालयात येण्याची गरज लागणार नाही,’’ असेही न्यायालयाने तिला सुनावले.
याचिकेला पुठलाही आधार नाही!
अलीकडच्या काही वर्षांत संतोष पुमारीने अनेकदा न्यायालयात धाव घेतली होती. ताज्या याचिकेत तिने केलेल्या दाव्याला कोणताही आधार नव्हता. 500पैकी 499 गुण मिळायला हवेत हे केवळ तिचे गृहितक होते, असे नमूद करत न्यायालयाने तिला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला.


























































