
मीरा-भाईंदर आणि उल्हासनगरात अजित पवार गट, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा हाती देऊन स्वागत केले.
मीरा-भाईंदर येथील अजित पवार गटाचे महासचिव इम्रान हाशमी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाच्या स्वप्नाली म्हात्रे, शोभा जाधव, सुनील सुर्वे यांच्यासह प्रभाग 14 मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनीही शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक नीलम ढवण, जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, उपजिल्हा संघटक प्राची पाटील, शहरप्रमुख दीपक नलावडे, प्रशांत सावंत, डिचंद्र राउलो यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
n उल्हासनगरातील आरपीआय गवई गटाचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रशांत धांडे, कल्याण-वालधुनी येथील वंचित बहुजन आघाडीचे नितीन वानखेडे, भाजपचे अशोक सकट, शिंदे गटाच्या कांचन लोंढे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, उपनेते गुरुनाथ खोत, विजय साळवी, जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, अल्पेश भोईर, शहरप्रमुख पैलास तेजी, उपजिल्हाप्रमुख भीमसेन मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

























































