
बीटेकची पदवी मिळवल्यानंतर नोकरी मिळवण्यात मुली आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. बीटेकनंतर 2025 मध्ये 54 टक्के मुलींना नोकरी मिळवण्यात यश आले आहे, तर 51 टक्के मुलांना नोकरी मिळाली आहे. यातील अनेकांना कॅम्पसमध्ये नोकरी मिळाल्याचेही भारत काैशलच्या अहवालात म्हटले आहे. एमबीए, बीटेक, एमसीए हे कोर्स रोजगार देणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. बीटेक-बीईमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअर, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी इंस्टमेंटेशन इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेपॅनिकलला मागणी आहे. नोकरी करण्यासाठी महिलांची राजस्थानला सर्वाधिक पसंती आहे. त्यानंतर केरळ, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, तामीळनाडू, उत्तर प्रदेश व कर्नाटकला पसंती आहे.
एमबीए, बीटेकला मागणी
2020 पासून आतापर्यंत एमबीए, बीटेक आणि एमसीए प्लेसमध्ये टॉप डिमांडवर आहे. एमबीए केल्यानंतर 72.76 टक्के, बीटेक किंवा बीईनंतर 70.15 टक्के, एमसीएनंतर 68.25 टक्के तरुणांना रोजगार मिळाला आहे. याशिवाय बीकॉमनंतर 62.81 टक्के, बीएसस्सीनंतर 61 टक्के, बीफार्मानंतर 58 टक्के, बॅचरल ऑफ आर्टनंतर 55.55 टक्के, आयटीआयनंतर 45.95 टक्के मुलांना रोजगार मिळाला आहे.
रोजगारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
केंद्रात मोदी सरकार आल्यापासून उत्तर प्रदेशात मागील सहा वर्षांपासून सर्वात जास्त रोजगार मिळत आहे, तर पहिल्या स्थानावर असलेले महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर गेले आहे. तिसऱ्या स्थानावर कर्नाटक राज्याचा नंबर लागतो. यानंतर केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरचा नंबर लागतो.





























































