पाकिस्तानातून हिंदुस्थानी महिला अचानक बेपत्ता

पाकिस्तानातील गुरुद्वारांना भेट देण्यासाठी गेलेली पंजाबमधील शीख यात्रेकरूंच्या गटातील एक महिला अचानक बेपत्ता झाली आहे. बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव सरबजीत कौर असे असून ती पिंड अमैनीपूर जिल्हा कपूरथळा (पंजाब) येथील रहिवासी आहे. सरबजीत कौर या 4 नोव्हेंबरला श्री गुरु नानक देव जी यांच्या जयंतीसाठी यात्रेकरूंच्या गटासोबत अटारी सीमेवरून पाकिस्तानला गेल्या होत्या. 10 दिवस विविध गुरुद्वारांना भेट दिल्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. पाकिस्तानातील हिंदुस्थानी एजन्सींनी सरबजीत कौर यांचा शोध सुरू केला आहे.