17 कोटींचे कोकेन विमानतळावरून जप्त

महसूल गुप्तवार्ता विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 17 कोटीचे कोकेन जप्त केले. कोकेनची तस्करी करणाऱया टांझानिया देशाच्या महिलेला अटक केली. तिने ते कोकेन खाऊच्या पाकिटात लपवले होते. युगांडा देशातील महिला ही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने डीआरआय च्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे साहित्याची तपासणी केली. खाऊच्या पाकिटात पांढरी पावडर आणि पावडर असलेल्या गोळ्या सापडल्या.

इथोपियातून कोकेन तस्करी करणाऱ्या दोघांना बेड्या

सप्टेंबरमध्ये डोंगरी पोलिसांनी एका ड्रग्ज तस्कराला पकडून तब्बल 15 कोटी रुपये किमतीचा तीन किलो कोकेन जप्त केले होते. हे कोकेन त्या तस्कराला पुरविणारे व ते इथोपिया या देशातून आणून विकणाऱया अन्य दोघांना डोंगरी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. पोलिसांनी सबिना गेस्ट हाऊस येथे छापेमारी करून तीन किलो कोकेनचा साठा करून ठेवणाऱया ड्रग्ज तस्कराला पकडले होते. आरोपीच्या चौकशीत त्याला कोकेन तरुण कपूर आणि साहिल अत्तारी यांनी दिल्याचे समोर आले होते.