राजकुमार रावला कन्यारत्नाचा लाभ

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्नी पत्रलेखा यांना शनिवारी कन्यारत्नाचा लाभ झाला. या दोघांच्या लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर घरी एक चिमुकली नन्ही परी आली आहे. मुलगी झाल्यानंतर या दोघांनीही सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसाठी शेअर केली आहे. घरी मुलीने जन्म घेतला असून देवाने आपल्याला सर्वात मोठी देणगी दिली आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. राजपुमार राव आणि पत्रलेखा यांचा विवाह 15 नोव्हेंबर 2021 रोजी झाला होता. आणि मुलीचा जन्मही 15 नोव्हेंबरलाच झाल्याने हे जोडपे आनंदी आहे.