
मुख्य सदस्याच्या निधनानंतर त्याच्या नॉमिनीला गृहनिर्माण सोसायटीची मेम्बरशीप मिळू शकत नाही. सक्षम प्राधिकरणाने वारसा हक्कानुसार निश्चित केलेल्या व्यक्तीलाच सोसायटीचे सदस्यत्व मिळू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
नॉमिनी हा केवळ कायदेशीर विश्वस्त असतो. त्याचे अस्तित्त्व तात्पुरते असते. सक्षम प्राधिकरणाने एखाद्या व्यक्तीला कायदेशीर वारस म्हणून जाहीर केल्यानंतर नॉमिनीचे सदस्यत्त्व संपुष्टात येते, असे न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने स्पष्ट केले.
एका सोसायटीने ही याचिका केली होती. या सोसायटीने मूळ सदस्याच्या निधनानंतर त्याच्या नॉमिनीला मेम्बरशीप दिली. या मेम्बरशीपला निबंधकाकडे आव्हान देण्यात आले. निबंधकाने ही मेम्बरशीप रद्द केली. मात्र अपील न्यायालयाने ही मेम्बरशीप वैध ठरवली. अपील न्यायालयाच्या या निकालाला सोसायटीने आव्हान दिले होते. न्या. बोरकर यांनी सोसायटीचा दावा मान्य केला.
वारसा हक्क होत नाही
नॉमिनीकडे वारसा हक्काचे अधिकार नसतात. तो आधीही सोसायटीचा सदस्य होता असा तर्प लावता येत नाही. अपील न्यायालयाने कायदेशीर तरतुदींकडे दुर्लक्ष करत नॉमिनीचे सदस्यत्व वैध ठरवले, असे निरीक्षण न्या. बोरकर यांनी नोंदवले.

























































