
सध्याच्या घडीला बाॅलीवूडमध्ये विकी कौशलचा दबदबा निर्माण झालेला आहे. ‘छावा’ या चित्रटानंतर विकी कौशल हा ए श्रेणीतील कलाकारांमध्ये गणला जाऊ लागला आहे. त्यामुळेच विकीची मानधनाची रक्कमही आता चांगलीच वाढली आहे. बाॅलीवूडमध्ये भाव वधारल्यानंतर, विकीने आपल्या अभिनय कौशल्याकडे आणि पात्राकडे सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
आगामी ‘महावतार’ चित्रपटात विकी हा विष्णू देवांच्या सहाव्या अवतारामध्ये आपल्याला दिसणार आहे. विकीने परशुरामाची भूमिका वठवण्यासाठी केवळ लूकवर मेहनत घेतली नाही. तर या चित्रपटासाठी त्याने मांसाहार आणि मद्यपानाचाही त्याग केला आहे. महावतार या चित्रपटाचा पहिला लूक देखील समोर आला आहे. अलीकडे कलाकार त्यांच्या भूमिकांबाबत हे प्रचंड सजग झालेले दिसून येत आहे. नितेश तिवारीच्या रामायणाच्या भाग 1 मध्ये काम करताना रणबीर कपूरनेही मांसाहार आणि मद्यपानाचा त्याग केला होता.
महावतार संदर्भात या चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिक याने स्वतःही मांसाहार आणि मद्यपानाचा त्याग केल्याचे आता समोर आलेले आहे. त्यामुळे सध्या विकी कौशलच नाही तर दिग्दर्शक अमर कौशिकनेही ‘महावतार’साठी मांस आणि मद्य सोडल्याचे वृत्ताची जोरदार चर्चा सुरु आहे. महावतारची घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. मॅडॉक फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत असून, 2026 च्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु आता मात्र हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे वृत्त आहे.


























































