
रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवानी सावंत-माने यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. रत्नागिरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणूक रिंगणात उभी आहे. रत्नागिरीकर आम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. माझ्यासह आमचे 32 नगरसेवक मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी माने यांनी व्यक्त केला.
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस, बसप, मनसे यांनी आज उमेदवारी अर्ज भरले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ज्या ठिकाणी दोन अर्ज आहेत किंवा डमी अर्ज आहेत ते मागे घेतले जातील आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढवू असा विश्वास शिवसेना उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केला.

























































