क्रिप्टो मार्केट पडले, बिटकॉइन 90 हजार डॉलरखाली

जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी टोकन बिटकॉइन सध्या प्रचंड घसरली आहे. मंगळवारी बिटकॉइन सात महिन्यांच्या खाली 90 हजार डॉलरपर्यंत खाली आले. ऑक्टोबरमध्ये बिटकॉइन 1 लाख 26 हजार डॉलरपर्यंत पोहोचले होते. बिटकॉइनला आतापर्यंत 30 टक्के फटका बसला आहे. आशियाई बाजारात मंगळवारी बिटकॉइन जवळपास 2 टक्के घसरून 89,953 डॉलरपर्यंत खाली आले. यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. क्रिप्टो मार्केट हा चढ आणि उतारासाठी ओळखले जाते. ही घसरण केवळ बिटकॉइनपर्यं मर्यादीत नाही. सर्वात मोठी दुसरी क्रिप्टोकरन्सी ईथऱ मध्येही घसरण होत चालली आहे. इथर जवळपास 40 टक्के घसरला आहे. आजही यात 1 टक्के घसरण झाली असून 2,997 डॉलर पर्यंत किंमत आली आहे.