नितीश कुमार 10 व्यांदा घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, गुरुवारी होणार शपथविधी सोहळा

नितीश कुमार हेच बिहारचे पुढील मुख्यमंत्री असतील. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यांना विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडण्यात आले. सम्राट चौधरी यांनी नितीश यांचे नाव प्रस्तावित केले. सर्व आमदारांनी नितीश यांच्या नावाला एकमताने पाठिंबा दिला. गुरुवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी नितीश कुमार १० व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

नितीश कुमार यांनी आज बिहारच्या राज्यपालांची भेट घेतली आणि राजीनामा सादर केला. एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना एक पत्र सादर केले, ज्यामध्ये नितीश कुमार यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला आहे.