
सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बुधवारी रात्री कोयता गँगने पुन्हा धुमाकूळ घालत हॉटेल चालकाला लुटल्याचा आणि धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. तसेच धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही? असा संतप्त सवालही केला आहे.
#गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन
पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे.. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही… pic.twitter.com/Ue7afQ8ujj
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2025
रोहित पवार यांनी आपल्या एक्सवर व्हिडीओ शेअर करत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये, #गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन पुण्यात रात्री हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला लुटण्याचा आणि धमकावल्याचा प्रकार म्हणजे पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचं निदर्शक आहे.. चार–दोन टग्यांना पकडून चौका-चौकात ‘नव पुण्याचे शिल्पकार’ म्हणून बॅनरबाजी करणारे मुख्यमंत्री यावर काही बोलणार की नाही? रात्रंदिवस पुण्यात #कोयता_गॅंग ची दहशत कायम असून, हे सत्य मुख्यमंत्री नाकारू शकत नाहीत. पुणेकरांनी किती दिवस दहशतीत रहायचं? भयमुक्त पुणे करण्यासाठी शक्य ती सर्व पाऊलं उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पोलीस प्रशासनाला देणार की नाही? आणि पुणेकरांसाठी निर्भय वातावरण निर्माण करणार की नाही? असा संतप्त सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.




























































