
भोपाळमध्ये एका नव्याने उघडलेल्या कॅफेत बुधवारी काही तरुणांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तोंडाला रुमाल बांधून आलेले तरुण हातात काठी व तलवार घेऊन कॅफेत तोडफोड करताना दिसत आहेत.
मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात मिसरोड भागात मॅजिक स्पॉट कॅफे नुकताच सुरू झाला होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास पंधरा ते वीस जणांचा एक घोळका कॅफेमध्ये घुसला व त्यांनी कॅफेत तोडफोड केली. कॅफेच्या काचा फोडल्या, किचन उद्ध्वस्त केलं, खुर्च्या टेबल तोडले. त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर कॅफेचा मालक सक्षम गिरी याने या तरुणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

























































