Photo – उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना केले अभिवादन

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते-सचिव विनायक राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच आमदार, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.