
>> नीलिमा प्रधान
प्रवासात सावध रहा
मेषेच्या सप्तमेषात बुध वक्री, अष्टमेषात शुक्र. कठीण प्रसंगावर मात करावी लागेल. राग वाढवणारी घटना घडेल. प्रवासात सावध रहा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारस्थाने वाढतील. शुभ दि. 25, 26
तडजोड करावी लागेल
वृषभेच्या षष्ठेशात बुध वक्री, सप्तमेषात शुक्र. सप्ताहाच्या सुरूवातीला तडजोड करावी लागेल. परिथितीचा अंदाज घ्या. प्रवासात घाई नको. नोकरीत बदलाची शक्यता. प्रगतीची संधी लाभेल. राजकीय क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. शुभ दि. 25, 26
संयम बाळगा
मिथुनेच्या पंचमेषात बुध वक्री, षष्ठेशात शुक्र. वारंवार वाद, तणाव असे प्रसंग येतील. संयम बाळगा. प्रकृतीची काळजी घ्या. नविन ओळखीत सावध रहा. वरिष्ठांची मर्जी राखा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. चाणाक्ष रहा. शुभ दि. 23, 24
अहंकार दूर ठेवा
कर्केच्या सुखेषात बुध वक्री, पंचमेशात शुक्र. कामाची योग्य रूपरेखा तयार करा. अतिशयोक्ती, अहंकार, उतावळेपणा नको. नोकरीत कामाचा व्याप राहील. गुंतवणूक वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. यश लाभेल. शुभ दि. 25, 26
अनाठायी खर्च टाळा
सिंहेच्या पराक्रमात बुध वक्री, सुखेषात शुक्र. प्रकृतीची काळजी घ्या. अनाठायी खर्च टाळा. महत्त्वाच्या वस्तू जपा. धंद्यात दिसण्यावर भाळू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग वाढेल. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. शुभ दि. 23, 24
अडचणींवर मात कराल
कन्येच्या धनेशात बुध वक्री, पराक्रमात शुक्र. अडचणींवर मात करून यश मिळवता येईल. तुमच्या क्षेत्रात पुढे जाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना पूर्ण करा. नविन परिचय उत्साहवर्धक असतील. खरेदी-विक्रीत लाभ. शुभ दि. 25, 26
प्रगतीची संधी लाभेल
स्वराशीत बुध वक्री, धनेषात शुक्र राश्यांतर. रेंगाळलेली कामे पूर्ण करा. दिग्गज व्याक्तींमुळे अत्मविश्वास वाढेल. प्रगतीची संधी लाभेल. नोकरीत बढतीचे योग. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. स्पर्धेत यश मिळेल. शुभ दि. 23, 24
दूरदृष्टिकोन बाळगा
वृशिचकेच्या व्ययेषात बुध वक्री, स्वराशीत शुक्र. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. व्यवहारात दूरदृष्टिकोन ठेवा. कामे मार्गी लागतील. प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश लाभेल. धंद्यात सुधारणा होईल. शुभ दि. 25, 26
चौफेर सतर्क रहा
धनुच्या एकादशात बुध वक्री, व्ययेषात शुक्र राश्यांतर. अतिआत्मविश्वास धोकादायक ठरेल. वाद वाढवणारे प्रसंग येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कारवाया वाढतील. चौफेर सतर्क रहा. जवळच्या व्यक्ती दिशाभूल करतील. शुभ दि. 25, 26
कार्याला वेग येईल
मकरेच्या दशमेषात बुध वक्री. एकादशात शुक्र राश्यांतर. कामे मार्गी लागतील. सप्ताहाच्या सुरुवातीला घाई करू नका. नंतर कार्याला वेग येईल. डावपेच लक्षात येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य निर्णय घ्या. प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 27, 29
वाद वाढवू नका
कुंभेच्या भाग्येषात बुध वक्री, दशमेषात शुक्र राश्यांतर. क्षेत्र कोणतेही असो विरोधकांना कमी लेखू नका. नोकरीत वर्चस्व वाढेल. वाद वाढवू नका. धंद्यात फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांचे मत जाणून घ्या. शुभ दि. 23, 24
योजना गतिमान कराल
मीनेच्या अष्टमेशात बुध वक्री, भाग्येषात शुक्र राश्यांतर. अनेकांचे सहकार्य लाभेल. योजना गतिमान करू शकाल. प्रेरणादायी घटना घडतील. नवीन ओळखी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेचांचे कौतुक होईल. शुभ दि. 24, 25




























































