
हिंदुस्थानातील आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसला अमेरिकेतील न्यायालयाने झटका दिला आहे. अमेरिकेतील सीएससी या कंपनीशी संबंधित ट्रेड सिक्रेट प्रकरणात टीसीएसविरुद्ध करण्यात आलेला 194 दशलक्ष अमेरिकन डॉलर नुकसानभरपाईचा दावा कोर्ट ऑफ अपील्सनेदेखील उचलून धरला आहे.
सीएससी ही कंपनी आता डीएक्ससी टेक्नॉलॉजी या कंपनीत विलीन झाली आहे. या कंपनीने टीसीएसविरुद्ध ट्रेड सिक्रेटचा गैरवापर केल्याचा खटला जिल्हा न्यायालयात दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने कंपनीविरुद्ध निकाल दिला होता. त्यास टीसीएसने कोर्ट ऑफ अपील्समध्ये आव्हान दिले होते. यासंदर्भात टीसीएसने एका निवेदनाद्वारे माहिती दिली असून पुढील कारवाईबाबत आढावा घेण्यात येत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.



























































