
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीस आज रविवारी विविध तीस देशांच्या दूतावासाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी येथील अजिंठा लेणी क्रमांक 1, 2, 10, 16, 17 व येथील कोरीव शिल्प कलाकृती पाहून हे राजदूत भारावून गेले. यावेळी येथे आल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या शिष्टामंडळास छत्रपती संभाजीनगर येथील गाईड संजय वासवानी, उमेश जाधव, विवेक पाठक, माया नरसापुरे आदींनी येथील लेण्यांची सखोल माहिती दिली. यावेळी देशातील अनेक राज्यांमध्ये विविध ठिकाणी पर्यटनस्थळ खूपच चांगल्या पद्धतीने जतन केले आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहून आम्ही खूपच आनंदी झालो आहोत. तसेच येथील लेणी क्रमांक 1, 2, 16, 17 या येथील झाडाच्या पानांपासून बनवलेले रंग अजूनही चांगल्या पद्धतीने जतन केले आहे. येथे येऊन आम्हाला खूप आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
काहींनी डोलित बसून लेणी पाहण्याचा आनंद घेतला. यावेळी शिष्टमंडळास बंदोबस्तासाठी संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, स.पो.नि. प्रफुल्ल साबळे, सिल्लोड, सोयगाव, अजिंठा फर्दापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात होता.



























































