
कुडाळ–बांव रस्त्यावर कुडाळ कविलकाटे जमादारवाडी येथे भरधाव वेगातील टेम्पोने पायी चालणाऱ्या लालसाब दौलसाब खाणापूर (49, रा. कविलकाटे जमादारवाडी) या मजुराला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो तेथील रस्त्यालगतच्या विद्युत खांबासह संरक्षक भिंतीला जाऊन धडकला. यात खाणापूर हे टेम्पोखाली सापडत गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास झाला.
























































