
मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे परिसरात शुक्रवारी पहाटे एका क्रेनने कंटेनरला धडक दिली. या अपघातात कंटेनरचे गंभीर नुकसान झाले. घटनेत जबाबदार ठरल्याने क्रेन चालक मनजिंदेर सिंग (27, पंजाब) याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार वैभव पांडुरंग पाटील (45, पालघर) आपला कंटेनर घेऊन वालोपे येथील आयशर वर्कशॉपजवळ थांबले असताना भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेनने त्यांच्या कंटेनरला अचानक धडक मारली.
























































