मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथे अपघात; तरुण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे नायशी फाटा येथे शनिवारी रात्री घडलेल्या एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमेश काणेकर (22, रा. शिवखुर्द, सुतारवाडी, ता. चिपळूण) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्परतेने धाव घेत त्याला मदतीचा हात दिला आणि तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.