
दोन तरुणांना स्टटंबाजी करणे जीवावर बेतले आहे. सोशल मीडिया साईट्सवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोकं वाटेल ते करायला तयार होतात. दोन मित्र असेच स्टंटबाजी करत असताना त्यांना जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना मुलांच्या हेल्मेटमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रविवारी सकाळी 10.20च्या सुमारास हा अपघात झाला आणि घटनास्थळीच योगेश (17) आणि अजय (18) चा मृत्यू झाला आहे. दोन्ही मित्र स्टंटबाजी करुन सोशल मीडिया वर रायडिंग ब्लॉग अपलोड करायचे.अपघात इतका भयंकर होता की, रस्त्यावर मांसाचे तुकडे पडले होते.
पोलिसांनी तपास केल्यावर सांगितले की, दोघांची भेट सोशल मीड़ियावरुन झाली होती. दोन्ही मित्रांमध्ये बाईक, स्पीड आणि स्टंट यावरच विषय असायचे. अपघातावेळी एकाच्याच डोक्यावर हेल्मेट होते आणि त्यातच कॅमेरा होता. त्यात घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मित्र दौसा येथून जयपूरला बाईक सर्व्हिसिंग करायला आले होते. अजय शर्मा याने तीन महिन्यापूर्वी ही बाईक खरेदी केली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, धडक त्यांना इतकी जोरदार लागली होती की, त्यांचे मृतदेह ओळखता येत नव्हते. दुर्घटनेनंतर पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. शिवाय घाट रस्त्यात दुचाकी घेऊन जाण्यास बंदी आहे. तरी देखिल ते तरुण तिथे दुचाकी चालवत होते.

























































