हे करून पहा! स्टीलची बादली अशी करा चकाचक

अनेक घरांमध्ये पाणी साठविण्यासाठी स्टीलच्या बादल्या वापरतात. कालांतराने या बादल्यांवर काळे डाग, साबणाच्या फेसाळ पाण्याचा थर लागतो. काही घरगुती उपायांनी अशी बादली स्वच्छ होते.

बादली पाण्याने धुतल्यानंतर डाग असलेल्या ठिकाणी दोन चमचे बेकिंग सोडा आणि पांढरे व्हिनेगर टाका. साधारणतः 10 मिनिटांनी बादली स्क्रबरने घासून घ्या. त्यानंतर बादली पुन्हा धुवा.

लिंबू आणि मिठानेदेखील बादलीवरील डाग जाऊ शकतात. लिंबू कापून त्याला मीठ लावा. यामुळे बादलीवरील पिवळेपणा आणि इतर डागही निघून जातील. गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड मिसळून त्यात बादली काही वेळा भिजत ठेवा.