
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर केली. मात्र या यादीत अनेक घोळ असल्याचं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने समोर आणलं आहे. यासाठी शिवसेना, मनसेसह विरोधी पक्षातील नेत्यांनी आयोगाकडे तक्रार ही दाखल केली आहे. नवीन प्रारुप मालदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचं समोर आलं आहे.
यातच आता मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय. याआधी अंतिम मतदार यादीसाठी 5 डिसेंबर ही तारीख होती, आता 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याने हरकती घेत निवडणूक आयोगाकडे नव्याने प्रारुप यादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला होता. त्यानुसार, नवीन सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 3 डिसेंबर 2025 असणार आहे. यातच यादीवरील हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचा दिनांक 10 डिसेंबर 2025 असेल.





























































