
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्यास सहमती दर्शवली आहे. 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या निवडीसाठी आपण उपलब्ध असू, असे कोहलीने दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली यांना कळवले आहे. रोहन जेटली म्हणाले, ‘विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे कळविले आहे. तो किती सामने खेळेल हे सध्या स्पष्ट नाही. पण त्याच्या संघातील उपस्थितीमुळे दिल्लीच्या ड्रेसिंग रूमला मोठा फायदा होईल.

























































