‘धुरंधर’ने प्रदर्शनाआधीच कमावले पाच कोटी

अभिनेता रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट उद्या, शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अडवॉन्स्ड बुकिंगमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच पाच कोटींची कमाई केली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये चित्रपटाची 51.6 लाखांची तिकिटे विकली गेली आहेत. ‘धुरंधर’ पहिल्या दिवशी 18 कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल आदी दिसणार आहेत.