नेपाळमध्ये 22 दिवसांत मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

नेपाळच्या मधेश प्रदेशमध्ये अवघ्या 22 दिवसांत मुख्यमंत्री सरोज कुमार यादव यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. बहुमत सिद्ध करता न आल्याने मुख्यमंत्र्यांवर राजीनामा द्यायची वेळ आली. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने सरोज यादव यांना विश्वासदर्शक ठरावानंतर बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. विश्वासदर्शक ठराव जिंकणे अवघड दिसत असल्याने यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. माजी प्रदेश प्रमुख सुमित्रा सुवेदी भंडारी यांनी संविधानाच्या कलम 168 (3) अंतर्गत सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले होते.