
जम्मू-कश्मीरमधील अनेक भागांत मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी सुरूच आहे. यामुळे या ठिकाणी थंडीची लाट पसरली आहे. तापमान प्रचंड खाली घसरले आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि जवळपासच्या परिसरात बर्फ गोठले आहेत. कश्मीर खोऱयात धुके पडल्याचे दिसत आहे. शेजारील राज्य हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका व मध्यम पाऊस तसेच हिमवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांतील तापमानात घट झाली आहे. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि बिहारमध्ये थंडीची लाट आली आहे.
























































