पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या दोघांना अटक

पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या दोन संशयितांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक लष्कराचा माजी सुभेदार आणि एका महिलेचा समावेश आहे. या दोघांवर गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. एके सिंह असे अटक करण्यात आलेल्या माजी शुभेदाराचे नाव आहे, तर रशमनी पाल असे महिलेचे नाव आहे. ही महिला दमनची रहिवासी आहे. हे दोघेही पाकिस्तानात बसलेल्या लोकांच्या संपर्कात होते. तसेच त्यांना हिंदुस्थानची गोपनीय माहिती पुरवत होते.