
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे एकत्र आले आहेत. मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. शिवाजी पार्क येथे निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, धूळ प्रतिबंधक आच्छादन आणि मंडप आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
(फोटो – रुपेश जाधव)





























































