
भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर सर्व पक्ष कसे चालतील हेही देवाभाऊच ठरवतात, असे मत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. राज्यातील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोढा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर स्तुतीसुमने उधळली.
मुख्यमंत्री फडणवीस आमच्या सर्वांचे राजकीय गुरू झाले आहेत. आपण देवाभाऊंची विविध रूपं पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रूपं आहेत, असेही लोढा म्हणाले.




























































