प्रसार भारतीचे अध्यक्ष सहगल यांचा राजीनामा

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी मार्चपासून ते अध्यक्ष पदावर होते. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ होता, परंतु कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला. सहगल हे 1988 च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सहगल यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, अखिलेश यादव यांच्यासोबतही काम केलेले आहे. त्यांनी अखिलेश यादव यांच्या ड्रीम प्रोजेक्ट लखनऊ-आग्रा एक्स्प्रेसवेमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.