
राजाई या संत नामदेवांच्या पत्नी. त्यांची जन्म तारीख, ठिकाण, समाधी यांची माहिती कुठेही फारशी उपलब्ध नाही. गोणाईंप्रमाणेच संत राजाईंच्या अभंगरचनासुद्धा त्यांच्या प्रपंचावर व संत नामदेवांच्या व्यक्तित्त्वावर प्रकाश टाकणाऱया आहेत. राजाईलाही नामदेवांच्या विठ्ठलाविषयीच्या भक्तीची चिंता लागली होती. नामदेवांचे संतपण, विठ्ठलाशी असणारे नाते उमजले नसल्याने संसार करताना होणारा त्रास राजाईने प्रांजळपणे आपल्या अभंगातून मांडला. संत राजाईंची नामदेवांविषयीची पार विठ्ठल ऐकून घेत नसावेत म्हणून आई रखुमाबाईसमोर त्या संसाराची झालेली परवड दुर्दशा मांडताना दिसतात. हे त्यांच्या पुढील अभंगात दिसून येते. “रखुमाबाई विठोबासी सांगा अताराशी का गा घेडे केले वस्त्र पात्र नाही काया जेवायासी नाचे अहर्निशा निर्लज्जासी ।। चवदा मनुष्य आहेत माझ्या घरी हिंडती दारोदारी अन्नासाठी बरा मार्ग तुम्ही उमजोनी सांगा नामयाची राजा भली नव्हे।।” आपल्या अभंगरचनेमधून संसाराबद्दल राजाईने स्त्राीमनाचे अतिशय हृदयस्पर्शी चित्र स्पष्ट केले आहे. त्यांनी अभंगातून प्रत्यक्ष विठ्ठलाशी संवाद न साधता माता रुक्मिणीशी संवाद साधला आहे. स्त्राrची व्यथा ही स्त्रीच जाणू शकते, असा भाव संत राजाईजवळ असल्याने त्या रुक्मिणीशी संवाद साधताना दिसतात.


























































