
2025 हे वर्ष आयपीओसाठी चांगले राहिले आहे. देशभरातील 96 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 60 हजार 705 कोटी रुपये जमवले आहेत. 2024 मध्ये 91 कंपन्यांनी 1 लाख 59 हजार 783 कोटी रुपये जमवले होते. हा आकडा डिसेंबरच्या अखेरपर्यंत 1.85 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये 25 हजार कोटी रुपये जमवण्याचा अंदाज आहे. 5 डिसेंबरपर्यंत एकूण 1,60,705 कोटी रुपये कंपन्यांनी जोडले आहेत.
आयसीआयसीआय प्रूडेंशियल म्युच्युअल फंड 11 हजार कोटी रुपये जमवणार आहे. 10 डिसेंबरला नेफ्रोकेयरचा 871 कोटी आणि पार्कमेडीचा 920 कोटींचा आयपीओ येणार आहे. ज्युनिअर ग्रीन एनर्जी 3 हजार कोटी, फ्रॅक्टल एनालिटिक्स 4,900 कोटी, क्लीन मॅक्स एनवायरो 5,200 कोटी रुपये जमवणार आहेत. डिसेंबर महिना संपल्यानंतर नव्या वर्षातही आयपीओचा सिलसिला सुरूच राहणार आहे. नव्या वर्षात पीएनजीएस रेवा डायमंड, कनोडिया सिमेंट, कोरोना रेमेडीज, मिल्की मिस्ट, स्कायवेज एअर, अमागी मीडिया लॅब्स, वीडा क्लिनिकल, एलसीसी प्रोजेक्ट्स, वाटरवेज लीजर, केएसएच इंटरनॅशनल, आर्डी इंजिनीअरिंग, सीआयईएल एचआर सर्व्हिसेज आणि मणिपाल पेमेंटचा आयपीओ येणार आहे. कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये सर्वात जास्त 38,308 कोटी रुपये जमवले. नोव्हेंबर 34,545 कोटी, ऑगस्टमध्ये 15,903 कोटी रुपये जमवले होते. या वर्षी टाटा कॅपिटलने सर्वात जास्त 15 हजार 511 कोटी रुपये जमवले आहेत. ग्रो ने 6632 कोटी, लेन्सकार्टने 7,278 कोटी, एलजीने 11,607 कोटी, हेक्सावेयरने 8750 कोटी आणि एचडीबी फायनान्शियलने 12,500 कोटी रुपये जमवले आहेत.



























































