एअरटेलचा युजर्सला दणका, दोन स्वस्त प्लान बंद

एअरटेलने आपल्या ग्राहकांना जोरदार दणका दिला आहे. कंपनीने दोन स्वस्त प्रीपेड प्लान अचानक बंद केले आहेत. कंपनीचे 121 रुपये आणि 181 रुपये किंमतीचे हे दोन प्लान होते. कमी किंमतीत यूजर्सला चांगले बेनिफिट्स मिळत होते. या प्लानची किंमत कमी असूनही 30 दिवसांची वैधता मिळत होती. कंपनीने हे दोन्ही प्लान बंद केल्यामुळे आता यूजर्सला एअरटेलचे महागडे प्लान रिचार्ज करावे लागतील. 121 रुपये किंमतीच्या प्लानमध्ये 8 जीबी हायस्पीड डेटा आणइ 30 दिवसांची वैधता तर 181 रुपयांच्य प्लानमध्ये 15 जीबीचा हाय स्पीड डेटा आणि 30 दिवसांची वैधता मिळत होती.