
मुलीची अगदी छोटीशी इच्छा पूर्ण झाल्यानंतर तिला झालेला आनंद पाहणे, यापेक्षा दुसरा मोठा क्षण बापाच्या आयुष्यात नसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साधारणतः दोन वर्षांच्या मुलीला तिचे बाबा तिच्यासाठी लहान सायकल आणून तिला सरप्राईझ देतात. आधी तिचे लक्ष नसते, पण अचानक पाठीमागे नवी कोरी सायकल पाहून मुलीला आधी कळतच नाही. मग तिला एवढा आनंद होतो की, जणू सारे विश्वच त्या एका क्षणात तिच्यासमोर आणून ठेवले आहे. धावत जाऊन बाबांना मिठी मारते आणि नंतर आईकडे जाते. हा आनंद कसा व्यक्त करावा, हेदेखील तिला कळत नाही, पण हे क्षण पाहून नेटिझन्सदेखील भारावून गेले आणि आपल्या बालपणाच्या आठवणींमध्ये रमले.




























































