मतमोजणीमुळे एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली, आता  4  आणि 11 जानेवारीला होणार परीक्षा

राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायती निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबर रोजी होणारी  एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून  आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2026 रोजी परीक्षा होणार आहेत.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अनुक्रमे येत्या 4 जानेवारी आणि 11 जानेवारी रोजी होणार आहे. यासंदर्भातील शुद्धीपत्रक  आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, अशी माहिती आयोगाने दिली.

 महाराष्ट लोकसेवा आयोगाची परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी  होती. याअनुषंगाने आयोगाने राज्यातील  सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागवली होती.  संबंधित जिल्हाधिकार्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही ठिकाणी परीक्षा उपकेंद्र आणि मतमोजणीचे ठिकाण जवळ आहेत. तसेच लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱया विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱयाची कमतरता यामुळे   परीक्षा घेण्यात   अडचणी उद्भवू शकतात. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

आयोगाच्या परपत्रकानुसार, एमपीएससी गट ’ब’ संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 4 जानेवारा रोजी  तर, महाराष्ट्र गट ’क’ ची संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 11 जानेवारी  रोजी होईल.