आयपीएलच्या बोलीयुद्धासाठी 359 खेळाडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रंगणाऱ्या बोलीयुद्धाचा बिगुल वाजला असून 16 डिसेंबरपासून अबूधाबी येथे होणाऱया ऐतिहासिक लिलावासाठी 77 जागांकरिता तब्बल 359 खेळाडूंची अंतिम यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 244 हिंदुस्थानी आणि 115 परदेशी खेळाडू असून यंदा श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांच्यावर संघमालक संघांची विशेष नजर राहणार आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या या यादीसाठी सुरुवातीला तब्बल 1,390 खेळाडूंनी नोंदणी केली होती. छाननीअंती 359 खेळाडूंना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या यादीतील 96 परदेशी खेळाडूंमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असून, क्विंटन डी कॉकच्या एण्ट्रीने लिलावात अधिक रंगत येणार आहे. यंदा 16 आंतरराष्ट्रीय हिंदुस्थानी खेळाडू लिलावात असून त्यापैकी कोणाच्या नावावर सर्वाधिक बोली लागेल, याबाबत क्रिकेटवर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. त्याचबरोबर यंदाच्या लिलावात उदयोन्मुख खेळाडूंचा भडिमार दिसतोय. तब्बल 224 अनकॅप्ड हिंदुस्थानी आणि 14 परदेशी चेहरे यावेळी मैदानात उतरले आहेत.