Video – सरकारनं जाहीर करावं की महाराष्ट्र अखंड ठेवायचा की तुकडे पाडायचे?

वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागलेत त्यांची भूमिका काय आहे? सरकारने जाहीर केले पाहिजे की महाराष्ट्र अखंड ठेऊ इच्छिता की तुकडे पाडू इच्छिता? हा महाराष्ट्राच्या मुळावर आघात करण्याचा विषय आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करतो तो महाराष्ट्राचा नाही. त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनात विदर्भासाठी काय प्रश्न मांडले, हे वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी स्पष्ट करावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.