
लष्करामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱया विद्यार्थ्यांना लष्करात नोकरी करण्याची संधी आहे. राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अकॅडमी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 30 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. यूपीएससीमार्फत घेतल्या जाणाऱया एनडीए आणि एनएची लेखी परीक्षा 12 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये लष्करात 208 जागा भरल्या जाणार आहेत. नौदलात 42 आणि हवाई दलात 120 जागा भरल्या जातील. तसेच नौदल अपॅडमी 10 वी प्लस 12 वी कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत 24 जागा अशा एकूण 394 जागा भरल्या जाणार आहेत. नॅशनल डिफेन्स अपॅडमीसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱया उमेदवाराचा जन्म हा 1 जुलै 2007 ते 1 जुलै 2010 या दरम्यान असावा. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. जनरल आणि ओबीसी उमेदवाराला अर्जासोबत 100 रुपये फी भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी आणि महिलांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. सविस्तर माहिती https://upsc.gov.in वर देण्यात आली आहे.

























































