
महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 ते 2024 या कालावधीत मुलं पळवण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढले आहे. लहान मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावणे, कामाला जुंपण्यासाठी आंतरराज्य टोळ्या निर्माण झाल्या आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि महत्त्वाच्या विषयावर सदनामध्ये चर्चा करावी, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.



























































