हिंदुस्थानी नागरिकांना लागलं फोनचं व्यसन, ‘हे’ काम करताना मोबाईलचा सर्वाधिक वापर; धक्कादायक अहवाल समोर

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. मात्र काळानुसार यात बदल होत गेली. तंत्रज्ञानाच्या या काळात सध्या इंटरनेट किंवा मोबाईल ही सुद्धा मुलभूत गरज झाली आहे. यामुळे कामं सोपी झाली असली तरी समस्याही वाढल्या आहेत. व्हिओने नुकसाच एक अहवाल प्रसिद्ध केला असून यात हिंदुस्थानी नागरिकांना मोबाईलचे व्यसन लागल्याचे म्हटले आहे. हे व्यसन एवढे वाढले आहे की, पालक आणि मुलं जेवण करतानाही एकमेकांशी संवाद कमी आणि मोबाईलचा अधिक वापर करत असल्याचे दिसून आले.

स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक भाग बनला असून मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. कोविड महामारी आणि लॉकडाऊन दरम्यान याचा फायदाही झाला. लोकांनी यावरून कामही केले आणि मनोरंजनही केले. मात्र स्मार्टफोनचा अतिवापर पालकांमध्ये व्यसन निर्माण करत असून मुलांसोबतच्या नात्यात दुरावा निर्माण करत आहे.

जवळपास 80 टक्के (पाच पैकी चार) हिंदुस्थानी पालकांनी मुलांसोबत वेळ घालवतानाही स्मार्टफोनवर व्यस्त असल्याचे मान्य केले आहे. तसेच स्मार्टफोन वापराची सरासरी वेळही चिंतजनक असून कोविडआधीच्या कालावधीपेक्षा आता स्मार्टफोनवर घालवलेल्या वेळेत 32 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 74 टक्के पालकांना असे वाटते की स्मार्टफोनमुळे त्यांच्या आणि मुलांच्या नात्यात दुरावा येत आहे.

90 टक्के पालकांनी हे देखील मान्य केले आहे की स्मार्टफोनच्या वाढलेल्या वापरामुले मुलांमध्ये अधिक आक्रमकता आली आहे. तसेच 85 टक्के पालकांना असेही वाटते की स्मार्टफोनमुळे मुलं सामाजिक वातावरणामध्ये सहज मिसळत नसून त्यांना भीती वाटते. 94 टक्के लोकांनी हे देखील मान्य केले की स्मार्टफोन त्यांच्या शरीराचा भाग बनला असून त्याच्याशिवाय ते राहूच शकत नाहीत.

कुठे सर्वाधिक वापर –

  • 70 टक्के लोक जेवण करतानाही स्मार्टफोनचा वापर करतात.
  • 72 टक्के लोक दिवाणखान्यात असतानाही फोनचा वापर करतात.
  • 75 टक्के कुटुंबासोबत बसलेले असतानाही फोनचा वापर करतात.
  • जेवण करताना 72 टक्के पालक, तर 30 टक्के मुलं स्मार्टफोनचा वापर करतात.
  • पालक दररोज सरासरी 4.4 तास, तर मुलं 3.5 तास स्मार्टफोन वापरतात.
  • 67 टक्के मुलं पालकांच्या व्यस्ततेमुळे आपली प्रश्नांची उत्तरे एआयला विचारतात आणि एआयशी त्याच्याशी संवादही साधतात.