Goa Club Fire – लुथ्रा बंधूंना थायलंडवरून हिंदुस्थानात आणले

गोव्यातील नाईट क्लबमध्ये आग लागून २५ लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी आणि क्लबचे मालक असलेल्या लुथ्रा बंधूंना (सौरभ आणि गौरव लुथ्रा) थायलंडवरून हिंदुस्थानात आणण्य़ात आले आहे. दिल्ली एअरपोर्टवर लुथ्रा ब्रदर्सला आणण्यात आले असून तिथून गोवा पोलीस त्यांचा ताबा घेणार आहेत.

गेल्या रविवारी क्लबमध्ये आग लागल्यानंतर लुथ्रा बंधूंनी तातडीने थायलंडला पळ काढला होता. गोवा पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस आणि इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली होती, तसेच त्यांचे पासपोर्टही निलंबित केले होते. या कारवाईनंतर आता त्यांना हिंदुस्थानमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बातमी अपडेट होत आहे.