खोपोलीत कारचा अपघात; चार जखमी

खोकल्याची उबळ आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटल्याची घटना आज खोपोली-शिळफाटानजीक घडली. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.

खालापुरातील वनवटे गावातून कलोते येथे जाण्यासाठी दत्तात्रेय पाटील, सुशीला ठोंबरे, रिया फाटे, कौस्तुभ पाटील हे आपल्या कार क्र. (MH.46.ΒΕ.1435) मधून सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून प्रवास करीत होते. दत्तात्रेय पाटील हे कार चाल वताना शेडवली फाट्याजवळ त्यांना खोकला आल्याने स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने तत्काळ खोपोली येथील खासगी जाखोटिया हॉस्पिटलला दाखल करण्यात आले.