ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार

बिघडलेले प्रिंटर, कालबाह्य झालेल्या लॅपटॉपवर काम करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र याबाबत अनेकदा लेखी तक्रार करूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलादपूर तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांनी ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकला आहे.

ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सुनील वैराळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार पाटील यांना निवेदन दिले. यावेळी ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे गुणवंती वाघ, शुभांगी सुरवंशी, प्रतीक्षा जाधव, शिल्पा पवार, ज्योती पाटील, डी. बी. जाधव, दत्तात्रेय चिमदे, नीरज लाहोरे, अभिषेक राऊत, मयूर सूर्यवंशी, राजेंद्र खाडे आदी उपस्थित होते.